दिवाळी जवळ आली आहे, काय नवीन खरेदी करायची हा प्रश्न पडला आहे.
या दिवाळीला एअर फ्रायर खरेदी करणार असल्यास आज एअर फ्रायरची माहिती व काही कृती.
आता भारतात एअर फ्रायर हा विषय नवीन राहिला नाही. सध्या ऑन लाईन शॉपिंगला तुम्ही बघाल तर एअर फ्रायर टॉपला आहे. एअर फ्रायर हा विषय मोठा टेम्टिंग आहे. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी आहे. एअर फ्रायर मध्ये २०० अंश से पर्यंत तपमान नेता येते आणि वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळा वेळ आणि तपमान अॅअडजस्ट करून तो, तो पदार्थ शिजवता येतो. फिलिप्स, बजाज, केन्स्टर, अशा अनेक कंपन्याचे एअरफ्रायर बाजारात उपलब्ध आहेत. त्या बरोबर येत असलेल्या माहिती पुस्तकात एक रंगीत चित्रांचे आकर्षक रेसिपी बुकही येते. त्यात हे सगळे बिनतेलात किवा अगदी कमीत कमी तेलात कशा करता येतात अशा कृती आहेत. फ्रेच फ्राइज, साबुदाणे वडे, कबाब, कॉर्न कटलेट्स, पट्टी समोसे, खुसखुशीत साबुदाणे वडे हाताला तेल न लागता खाण्याची खुमारी वेगळीच असते. पट्टी समोसे, कटलेट आणि स्प्रिंग रोल भारी तेल पितात म्हणून करणे टाळतो पण एअरफ्रायर मध्ये एक चमचा तेलात मात्र ते फारच सुरेख होतात. फक्त ग्रिझिंग केलेली कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबिर वडी, कांदा भजी. क्रिस्पी भेंडी, कुरकुरीत कारली, मटार करंजी, खस्ता कचोरी, मठरी, अगदी १/२ ते १ चमचा तेल चोळून मस्तं खुसखुशीत होतात पदार्थ. या व्यतिरिक्त आपल्या वाळवणाचे पदार्थ म्हणजे पापड्या, बाजरीच्या चकल्या, साबुदाण्याच्या चकल्या, कुरडया हलके तेल ब्रश करुन फ्राय केले की छान फुलतात. मसाला पापडसाठी यात पापड फ्राय केला तरी पण ते जरा नाजूक काम आहे, पापड हवेने उडून तुटू शकतो म्हणून योग्य तापमान सेट केले की होतो छान. वेळ आणि तापमानाचे गणित पक्के बसले की पदार्थ मस्तं होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
एअर फ्रायर मध्ये बनणार्या काही कृती
रिकोटा लेमन केक
साहित्य- ५०० ग्राम रिकोटा चीज, १ मध्यम लिंबू (लिंबू आदल्या दिवशी फ्रिजरमध्ये ठवून द्या कारण आपल्याला त्याची किसलेली साल हवी आहे.), १५० ग्राम साखर, २ टीस्पून वॅनिला इसेन्स, ३ अंडी,४ ते ५ चमचे कॉर्न स्टार्च + १/२ चमचा बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ.
कृती:- फ्रिजरमध्ये ठेवलेल्या लिंबाची साल चांगली किसली जाते म्हणून ते डीप फ्रिज मध्ये ठेवा. केक करायच्या वेळी बाहेर काढून किसा व त्यातील अर्ध्या लिंबाचा रस काढा. रिकोटा चीज एका बाउल मध्ये काढून घ्या व चमच्याने फेटा किवा हँडमिक्सीने ब्लेंड करा. त्यात साखर मिसळा. वॅनिला अर्क, लिंबाची साल व अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि बिट करा. एक एक अंडे त्यात फोडून घाला आणि फेटत रहा. कॉर्नस्टार्च मध्ये चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर घालून मिक्स करा व हा स्टार्च चीजच्या मिश्रणात घालून बिट करा. हे सगळे मिश्रण केकच्या भाड्यात ठेवा. एअर फ्रायर १६० अंश से वर प्रिहिट करा. ते भांडे एअर फ्रायर मध्ये ठेवा.२५ मिनिटे ए फ्रायर मध्ये ठेवा. बेल झाली की एक मि. नंतर उघडा. बाहेर काढून जाळीवर टाका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply