ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा
साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार
कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). ज्वारीच्या लाहय़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात. म्हणजे त्यातील वाळू पाण्यात निघून जाते. हे सर्व मिक्स करून त्याच्या बारीक बारीक वडय़ा कराव्यात व उन्हात वाळवाव्यात. वाळल्यावर त्या बरणीत भरून ठेवाव्यात. तळून व न तळता खायला छान लागतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीचे धापोडे
साहित्य : ज्वारी १ किलो, तीळ ४ चमचे, मीठ चवीनुसार, तिखट पाऊण चमचा, दही १ चमचा
कृती :- ज्वारीचे पीठ, दही पाणी एकत्र करून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पिठाच्या दुप्पट पाणी उकळून त्यामध्ये तीळ, मीठ घालून आंबवलेले पीठ घालून चांगले शिजवून घ्या. साधारण डोश्याच्या पिठाएवढे घट्ट करा. नंतर एका कापडावर पळीच्या साहाय्याने पीठ गोल पापडाच्या आकारासारखे पसरवा. दिवसभर उन्हात वाळून ते कापड पालथे करा व त्यावर पाणी शिपडून दोन मिनिटांनी हलक्या हाताने पापड काढून परत एक दिवस वाळवत ठेवा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीच्या कळणाची भाकरी
साहित्य : ज्वारी ४ वाटय़ा, उडीद १ वाटी, खडे मीठ ४ चमचे
कृती : ज्वारी, उडीद व खडे मीठ एकत्र करून दळून घ्यावे व साध्या भाकरीप्रमाणे त्याच्या भाकरी बनवून खावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीचे धपाटे
साहित्य : ३ वाट्या ज्वारी पीठ १ वाटी कांदा किसून १ टी स्पून लसूण १ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट १/२ वाटी कोथिंबीर तिखट मीठ तेल
कृती : ज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.
पातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.
तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..! दही किंवा चटणी सोबत खावीत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीचे नूडल्स
साहित्य : २ वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे.
कृती : आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे. सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून त्यात शेवेची जाड ताटली घालून शेव चाळणीवर पाडावी व आपण उकडीचे मोदक वाफवतो त्याप्रमाणे शेव चमक येईपर्यंत वाफवावी. सर्व भाज्या बारीक उभ्या चिराव्यात. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात नंतर आलं- लसूण पेस्ट घालावी. नंतर सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्या वाफल्यावर त्यात ज्वारीचे नूडल्स घालावेत. हलक्याय हाताने नूडल्स, भाज्या परताव्यात. वरून थोडे चवीपुरते मीठ घालावे. गरम गरम नूडल्स सर्व्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
ज्वारीचे थालिपीठ
साहित्य : २ वाट्या ज्वारीचे पीठ, १ कांदा, मूठभर कोथिंबीर, १ चमचा तिखट, मीठ, हिंग, हळद, तेल, २-३ लसणाच्या पाकळ्या.
कृती : ज्वारीच्या पिठात १ कांदा चिरून व २-३ पाकळ्या लसूण ठेचून घालावा. २ चमचा तेल व वरील सर्व पदार्थ घालून पीठ मऊसर भिजवावे व त्याची १-१ चमचा तेल तव्यावर घालून थालिपीठे लावावीत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply