आख्खा मसूर.. ( यालाच आम्ही मसुरीची आमटीही म्हणतो ) वास्तवीक अनेक जण मसूर डाळ वापरतात म्हणून या आमटीला डाळ नसलेली या अर्थाने आख्खा मसूर हे नाव हॉटेल वाल्यांनी फेमस केलं. असो… मुळ मुद्याकडे वळूयात.
साहित्य : भिजवलेले मसूर, कांदा, खवलेला नारळ, आलं लसूण पेस्ट, जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, शहाजीरे, हिरवा वेलदोणा ( याला अनेक जण हिरवी वेलचीही म्हणतात ), मिठ, हिंग, मोहरी, कोथिंबीर, आमसुलं.
कृती :
कांदा उभा चीरुन तेलावर डार्क ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या, नंतर खवलेला नारळ आय मिन ओलं खोबरंही परता. यात,जिरे,मिरे,दालचिनी,लवंग, जीरे, शहाजीरे टाकून अगदी बारीक वाटण तयार करुन ठेवा.
जिरे मोहरीची फक्कड फोडणी करा, यात कांदा टाका मस्त तपकीरी होऊद्या… आलं लसुण रेस्ट टाका आता त्यात हळद हिंग टाका, आणि मग मसूर फोडणीत टाका, यावर आवडीप्रमाणे तिखट टाका, परतुन घ्या, छान खमंग अरोमा आल्यावर यात थोडंसं पाणी टाका, मिठ टाका आणी उकळी येऊ द्या. मसूर चटकन शिजते. उकळी आल्यावर केलेलं वाटण टाका, स्वछ धुवून आमसुलं टाका… दणकुन उकळी आणी वाफ येऊ द्या. आंच बंद करा. कोथिंबीर टाका, आख्खा मसूर तयार आहे.
– संजय वैद्य
Leave a Reply