साहित्य:- १ कप दूध व अजून पाव कप दूध अळीव भिजवायला, १ ते दिड टेस्पून अळीव, ३ ते ४ बदाम, १ खारकेचे तुकडे किंवा १ खारकेची पूड, साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून), चिमूटभर वेलचीपूड.
कृती:- एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत (टीप ५). बदाम आणि खारीक दुसर्या् वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. (महत्त्वाची टिप १ पाहा). अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत. ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील. बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे. दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.
आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.
टीप:-अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply