आंध्र प्रदेशात तेलगु आणि हैदराबादी खाद्य सांस्कृतिचा मिलाफ झालेला पहायला मिळतो. दक्षिण भारतीय खाद्यपदाथातील वाटी म्हणून आंध्र प्रदेश ओळखला जातो. भारतीय पदार्थात आंध्रातील पदार्थ स्वादिष्ट, मसालेदार आणि उष्ण समजले जातात. या जेवणात मसाल्यांचा विपुल प्रमाणात उपयोग होतो. भात हे आंध्रातील मुख अन्न असून ते सांबर किंवा इतर भाज्या सोबत वाढले जाते. तसेच हैद्राबादी आणि आंध्रातील खाद्यपदार्थांवर मोगलाई प्रभावही दिसून येतो.येथील खाद्यपदार्थ खूप चवदार असतात आणि त्यासाठी मसाल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बिर्याणी हैदराबादी हालीम, भगरा, बैंगन, खिमा या पदार्थां सोबत ‘ अवकैय्या ‘ हे कैरिच लोणच ‘ गौग्युरा ‘ हे पानाच लोण च प्रसिद्ध आहे दह्याचाही पदार्थ बनवताना उत्तम स्वादासाठी वापर होतो. मसालेदार रुचकर पदार्थ ही आंध्रप्रदेशाची ओळख आहे. औरंगजेबाने हैद्राबाद ताब्यात घेतले आणि तिथून ‘हैद्राबादी बिर्याणी’ उदयास आली. नंतर तिचा प्रवास ‘टिपू सुल्तान’सोबत म्हैसूरपर्यंत गेला. त्यामुळे, बिर्याणी हा प्रकार नवाब आणि निजाम यांचा राजेशाही पदार्थ म्हणूनच याला मान्यता मिळाली. बिरयानी जास्त करून मांसाहारीच बनवितात पण भारतात बरेच लोकं शाकाहारी असल्यामुळे ‘व्हेज बिरयानी’चा देखील उगम झाला आणि ती देखील तितकीच चविष्ट लागते! हैद्राबादी बिर्याणी बरोबरच आंध्रचे इतरही पदार्थ प्रसिद्ध आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही पदार्थ आंध्र प्रदेशच्या खाद्यसंस्कृतीतील
बिर्याणी मसाला
व्हेज बिर्याणी
अरातीकाया मसाला पुलुसु
कज्जीकायल
मोरू कालन
Leave a Reply