साहित्य: १५ बेबी कॉर्न, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून जिरेपूड, १/२ टिस्पून धणेपूड, १/४ टिस्पून आमचूर, चवीपुरते मिठ,
तळणीसाठी तेल.
कृती: बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावी. कॉर्न फ्लोअर एका लहान वाडग्यात घ्यावे. त्यात सर्व मसाले आणि मिठ घालून मिक्स करावे. या मिश्रणात २ ते ३ टेस्पून पाणी घालून मध्यमसर भिजवावे. कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी. कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात ३ ते ४ बेबी कॉर्न घोळवून घ्यावी. गरम तेलात तळावीत. सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावीत. टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावीत.
Leave a Reply