साहित्य :- १ वाटी बाजरीचे पीठ, १ वाटी मटार दाणे, १/२ वाटी बेसन, १ टे.स्पू. आलं- लसूण पेस्ट, १ टे.स्पू. मिरची पेस्ट, कोथिंबीर, १ टे.स्पू. प्रत्येकी ओवा, लाल तिखट, धने पावडर, १ टे.स्पू. भाजलेले तीळ, मीठ, किंचित साखर, चिमूटभर सोडा, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती :- मटार थोडेसे वाफवून घ्या. तेल आणि फोडणीचं साहित्य सोडून सगळे साहित्य मिक्स् करून थोडं थोडं पाणी घालून गोळा मळा. (सोडा घालणार नसाल तर १ टे.स्पू. गरम तेलाचं मोहन घाला). या पिठाचे अलगद हाताने मुटकुळे वळा. तळणार असाल तर लगेच हे मुटकुळे तळता येतील. तळण नको असेल तर मुटकुळे वाफवून घ्या. थोड्या तेलाची खमंग फोडणी करून त्यात मुटकुळे परतून घ्या.
नुसते किंवा सॉसबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply