
साहित्य:- १ भांडे लाल चवळी, चहाचे २ चमचे गरम मसाला, हळद, मीठ व बारीक कांदा, ओले खोबरे, गूळ, फोडणीसाठी कांदा.
कृती:- चवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला २/३ शिट्टय़ा देऊन उकडून घ्यावी. नंतर पातेलीत कांद्याची फोडणी करून त्यात चवळी टाकावी. तिच्यात हळद, मीठ व गूळ घालावा व उसळ शिजू द्यावी. वरून ओले खोबरे (न वाटता) घालावे व आपल्याला हवी त्या प्रमाणात उसळ सैल व घट्ट करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply