
साहित्य : बटाटे, तेल,हिंग,मोहरी,जिरे,हळद,तिखट, कडीपत्ता, धणे-जिरे पूड,मीठ चवीनुसार.
कृती : प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्यात हिंग,मोहरी,जिरे,कडीपत्ता याची फोडणी देणे. मग त्यावर हळद,तिखट,धणे-जिरे पूड घालणे. बटाट्याच्या बारिक फोडी करुन त्या फोडणीमध्ये एकजीव करुन घेणे. व झाकण ठेवून शिजवणे. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून एक वाफ काढणे. अशाप्रकारे बटाट्याची काचरा भाजी तयार.
Leave a Reply