
साहित्य : सारणासाठी-दोन मोठे बटाटे, पाव वाटी खवा, पाव वाटी साखर, दोन टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून दूध, २-३ काड्या केशर, १ टेबलस्पून वेलचीपूड, थोडे मनुके बारीक तुकडे करून, काजू-बदाम बारीक कुटून.
आवरणासाठी : २ कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, १ टेबलस्पून तेल (गरम), मीठ चवीने, दूध, पीठ भिजवण्यासाठी.
कृती : बटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.
भिजवलेल्या पिठाचे एकसारखे आठ गोळे बनवून घ्यावेत. दोन गोळे घेऊन पुरीसारखे लाटून त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा दाबून घेऊन थोडी लाटून घ्यावी. नॉनस्टिक तवा गरम करून घेऊन पोळी भाजून घ्यावी. पोळी सर्व्ह करताना वरून तूप लावावे. मग सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply