साहित्य: मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरून कोथिंबीर, अर्धीपळी कच्चे तेल, थोडे पाणी, चिमुटभर साखर, चवीप्रमाणे मिठ, हळद, हिंग.
कृती: बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या. थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा. पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.
Leave a Reply