
साहित्य :
३ वाट्या हरबऱ्याच्या डाळीचे रवाळ पीठ
दीड वाटी डालडा तूप
पाव वाटी दूध
३ वाटचा पिठीसाखर
७-८ वेलदोड्यांची पूड
अर्धा जायफळ पूड
२५ ग्रॅम बेदाणा
१० ग्रॅम काजूचे काप
कृती :
तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या. छान वास आला की त्यावर दूध शिंपडून बाजूला ठेवा. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर, वेलदोडे, जायफळ, बेदाणा, काजू घालून मिश्रण कालवा. नंतर त्याचे बेताच्या आकाराचे लाडू वळा. मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवावा व प्रत्येक लाडू साच्यातून काढावा. आकाराच्या नाविन्यामुळे छान दिसतात.
Leave a Reply