भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १२ – स्वातंत्रोत्तर काळ

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या आधी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्नधान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आले आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज गणला जातो.

पन्नासच्या दशकात उडपी आणि पंजाबी लोकांनी आपल्या खाद्यसंस्कृतीचे पाय देशभर पसरायला सुरवात केली. पाव घराघरात पोचला होताच. पण साठच्या दशकात रेडीमेड बटर आणि चीज यांचाही वापर होऊ लागला. ओव्हन, टोस्टर या गोष्टी विकत मिळू लागल्या आणि घरच्या स्वयंपाकघरात केक बनू लागले.

साठ सत्तरच्या काळात फराळाचे तयार जिन्नस दुकानांमधे मिळू लागले. मिठाई तर मिळू लागली होतीच. तरीही बर्‍याच गोष्टी घरी तयार करण्याकडे कल होता. इडली, डोसे, मेदूवडे यांसारखे पदार्थ आता घरीच बनवायला सुरुवात झाली होती. उत्तरेकडचा चाट सगळीकडे लोकप्रिय झाला आणि भेळ, पाणीपुरी वगैरे पदार्थ देशभर लोकप्रिय झाले. ऐंशीच्या दशकात सामोसे, पॅटीस, कटलेट वगैरे मंडळींनी सगळीकडे जम बसविला.

नव्वदाच्या दशकात जागतिकीकरणामुळे खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाला. चायनीज पदार्थ आवडीने खाल्ले जाऊ लागले. पंजाबी छोले बटोरे, पाव भाजी सारखे पदार्थ, पनीरचे पदार्थ सगळीकडे लोकप्रिय झाले. 2000 व्या दशकात आता मेक्सीकन, थाई, इटालियन पदार्थ हॉटेलच्या मेनू कार्डावर दिसू लागले. मोंगलाई पदार्थांनी आपलं निर्माण केलेलं स्थान मात्र अजूनही अटळ आहे.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*