साहित्य:- सहा छोटे पडवळ, ओले खोबरे अर्धी वाटी, टोमॅटो पाव वाटी, पाच-सहा लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या ४-५, धने – जिरे – ओवा प्रत्येकी एक चमचा, गूळ-मीठ चवीप्रमाणे, तेल अर्धी वाटी, हिंग-मोहरी-मेथी.
कृती :- पडवळाच्या बिया काढाव्यात. सर्व मसाल्याचे पदार्थ, खोबरे, टोमॅटो एकत्र वाटावे. त्यात मीठ, चिरलेला गूळ, मसाला घालून पडवळाच्या बिया घालून एकत्र करावे व पडवळात भरावे. पसरट फ्राईंग पॅनमध्ये अर्धी वाटी तेल घालून हिंग, मेथी, मोहरीची फोडणी करावी. त्यात पडवळ ठेवून मंद आचेवर वाफ आणावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply