
साहित्य:- ८-१० भावनगरी मिरची, १/२ वाटी पनीर (किसलेले), ३-४ उकडलेले बटाटे, १ चमचा तिखट, अर्धी वाटी काजू- किसमिस, बेदाणे, २ चमचे तेल, मीठ चवीनुसार.
कृती:- भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण मिरचीमध्ये भरून थोडेसे तेल लावून काचेच्या पसरट भांडय़ात ठेवून मायक्रो हायवर ३ मिनिटे ठेवावे. परत थोडेसे तेल लावून मायक्रो हाय वर ३ मिनिटे ठेवावे. गरम सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply