साहित्य : ४ मध्यम आकाराची हिरवी कारली, ओलं खोबरं (खोवलेलं) – १ वाटी, आल लसुण पेस्ट – १ चमचा, लाल तिखट/ कांदा-लसूण तिखट – चवीनुसार, दाण्याचे कुट, फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद), तेल, गूळ, मीठ, कोथींबीर, पुड्याचा दोरा.
कृती : सर्वप्रथम कारली मधोमध कापावीत(आडवे काप घ्या). व नंन्तर उकडून घ्यावीत. ऊकडलेल्या कारल्याला एक काप देवुन त्यातील बिया काढुन टाकाव्यात. खोबरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, दाण्याचे कुट, गूळ, मीठ, कोथींबीर एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण कारल्यात भरावे. मसाला बाहेर पडू नये म्हणून भरलेल्या कारल्याला दोरा गुंडाळावा. तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करावी व त्यात भरलेली कारली परतून घ्यावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply