साहित्य :- पाव किलो भेंडी, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक चमचा धने-जिरे पावडर, लाल तिखट एक चमचा, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस, मीठ, साखर, चवीप्रमाणे, अर्धा चमचा गरम मसाला, ओले खोबरे अर्धी वाटी, कोथिंबीर, तेल.
कृती :- भेंडीचे डोके व खालचा बाग कापावा. मधे उभी चीर द्यावी. कांदा, टोमॅटो बारीक चिरून चमचाभर तेलावर परतावे. आले-लसूण पेस्ट, धने – जिरे पूड, तिखट, हळद, आमचूर पावडर, मीठ, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ साखर हे सगळे थोड्या तेलावर परतावे. ओले खोबरे, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवावे. खाली उतरवावे. थंड झाल्यावर हा मसाला भेंडीत भरावा. कढईत दोन मोठे चमचे तेल घालून फोडणी करावी. त्यात भरलेल्या भेंड्या घालून मंद आचेवर परताव्यात, वाफ आणावी. वरून खोबरे कोथिंबीर भुरभुरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply