साहित्य:- कोवळी तोंडली पाव किलो, अर्धी वाटी नारळाचा चव, पाव वाटी दाण्याचे कूट, चिंचेची दोन बुटूक , मीठ व चिरलेला गूळ चवीप्रमाणे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, तेल 4-5 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता.
कृती:- तोंडल्याला भरल्या वांग्याप्रमाणे उभे दोन काप द्यावेत व ती कुकरमध्ये कोरडीच थोडी वाफवून घ्यावीत. खोबरे, दाण्याचे कूट, चिंच, गूळ, मीठ, थोडी कोथिंबीर एकत्र वाटावे. त्यात तिखट, मसाला घालून कालवावे. तोंडल्यात हा मसाला भरावा. कढईत तेल, हिंग, मोहरी घालून फोडणी करावी. हळद घालावी. कढीपत्ता घालावा. मग त्यात भरलेली तोंडली घालून हलवावे. उरलेला मसाला व अर्धी वाटी गरम पाणी घालून मंद गॅसवर, झाकण ठेवून भाजी शिजवावी. तोंडली किंचित वाफवलेली असल्याने भाजी फार शिजवू नये. या भाजीसाठी तोंडली न वाफवताही घेऊ शकता. तयार भाजीवर ओले खोबरे, कोथिंबीर घालून गरमागरम भाजी वाढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply