साहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे.
कृती:- बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट मीठ घालून मळून ठेवावे. तुपाचा हात आवश्य क तर मळताना लावावा व गोळा करावा. नारळ चव, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस व बेदाण्याचे तुकडे घालून सारण बनवावे. भिजवलेल्या पिठातला गोळा घेऊन राजगिरा पिठावर पारी लाटावी. त्यात सारणाचा गोळा ठेवून बंद करावी. राजगिरा पिठावरच हलका पराठा लाटावा. हाताने हलके थापत मोठा करावा. चिरा पडतील त्या नीट करून घ्याव्यात. तापल्या तव्यावर दोन्हीकडून तूप सोडून खमंग भाजावा. दही, चटणीबरोबर सर्व्ह करावा.
Leave a Reply