साहित्य : वाल, १ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग,१/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट ,४ कडीपत्ता पाने, १ टिस्पून जिरे, १ टिस्पून गूळ, २ आमसुलं, १/४ कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती ः वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
कढईत तेल गरम करावे. त्यात १/४ टिस्पून मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडे पाणी घालावे.
आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी.
डाळींब्या अर्ध्या शिजल्या कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
Leave a Reply