साहित्य:- १ सॅंडविच ब्रेड, मटकी, मटार, छोले यांसारखी कुठलीही सुकी उसळ, आले- मिरचीची पेस्ट १ टी स्पून, गोड दही, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, तेल, चाट मसाला, चिंच-गुळाचा कोळ, चवीनुसार तिखट, मीठ, साखर, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा.
कृती : ब्रेडच्या कडा काढून त्यात उसळ भरून सॅंडविच करावं. त्याचे प्रत्येकी चार चौकोनी तुकडे करावेत. दह्यात आलं- मिरची पेस्ट, मीठ, साखर इ. घालून वरून फोडणी द्यावी. दहीवड्याप्रमाणे दही करावे. खोलगट डिशमध्ये सॅंडविच ठेवून त्यावर दही, चिंच-गुळाचा कोळ, कांदा, कोथिंबीर, शेव हे पदार्थ घालून वरून चाट मसाला, तिखट भुरभुरावं. झटपट चाट तयार. नंतर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply