बैंगन रायता

Brinjal (Baingan) Raita

साहित्य:

एक मोठे भरताचे वांगे
एक इंच आले व अर्धी किंवा एक हिरवी मिरची वाटून केलेले वाटण
चवीपुरते मीठ
२ कप दही
४ ते ५ लसणाच्या पाकळ्या
२ टीस्पून तेल
अर्धा टीस्पून हळद
१/४ टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
मिरपूड

कृती:

वांगे चांगले धुवून घ्या. त्याच्या गोल चकत्या कापा. त्यांना मीठ लावून ठेवा. अर्ध्या तासाने पिळून घ्या. त्या चकत्यांना आलं-मिरचीचे वाटण लावा. या चकत्या तेलात खमंग तळा.

एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात मीठ व लसणाच्या पाकळ्या वाटून घाला. तेल गरम करा. त्यात तळलेले वांग्याचे काप घाला व त्यावर वरील दह्याची फोडणी घाला. वरुन थोडी मिरपूड भुरभुरवा. अशाप्रकारे चटपटीत आणि चवदार असा बैंगन रायता तैयार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*