साहित्य : बेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण पेस्ट चार चमचे, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, मदा भाजलेला छोटा एक ते दीड चमचा, रेड ऑरेंज रंग. छोटा पाव चमचा.
कृती : दह्यामध्ये धनेजिरे पावडर, हळद, तिखट, आलंलसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, रेड ऑरेंज रंग, एक चमचा व्हिनेगर, भाजलेला मदा इ. घालून हे मिश्रण चिकनला आतूनबाहेरून चांगले चोळून दीड ते दोन तास झाकून ठेवावे. यानंतर चिकनला जर तंदूरमध्ये भाजायचे असेल तर एका सळईला ते लावून मंद आचेवर भाजून घ्यावे, मध्ये मध्ये तेल लावावे. असे भाजलेले चिकन बाहेर काढून त्याचे मनाप्रमाणे तुकडे करून घ्यावेत.
एका पातेल्यात दोन वाटय़ा ग्रेव्ही घालून त्यात बटर घालावे. थोडे पाणी घालून उकळावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवावे. असे तयार झालेले चिकन सव्र्ह करताना यावर फ्रेश क्रीम घालून बटर नानबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply