भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १२ – स्वातंत्रोत्तर काळ
एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या आधी दुसर्या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्नधान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आले आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज गणला जातो. […]