सोड्याची खिचडी
साहित्य : एक पेला तांदूळ, अर्धा वाटी कापलेले सोडे, दोन पेले नारळाचे दूध, एक टीस्पून लसूण पेस्ट,तिखट,दोन मोठे कांदे,८ लवंगा,८ मिरे,दोन बडी वेलची, ४ हिरव्या वेलच्या,दोन काड्या दालचिनी,दोन तमालपत्र,एक टी स्पून शहाजिरे,हळद,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर,दोन पाकळ्या लसूण. कृती ः प्रथम एक पेला तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. मग अर्धी वाटी सोडे धुऊन त्याला हळद,मीठ,लसूण पेस्ट चोळून थोडा मसाला लावावा. धुतलेल्या तांदुळाला हळद,मीठ,तिखट आणि एक टी स्पून शहाजिरे चोळून ठेवावे. ज्या भांड्यात खिचडी […]