तांदळाचे लाडू
साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]
साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]
दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. […]
साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ. कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या […]
साहित्य : ५०० ग्रॅम ताजे दही, ५० ग्रॅम पिठीसाखर, १० ते १५ धागे केशर, १ चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर – ३ ते ४ वेलची , ५ ते ६ बारीक कापलेले पिस्ते, ५ ते ६ बारीक कापलेले बदाम. कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून २ ते ३ तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या. तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.
साहित्य : पाव किलो चक्का (सायीचा), २ आंब्यांचा रस, १ वाटी साखर. कृती : चक्क्यामध्ये २-३ तास आधीच साखर मिसळून ठेवावी. नंतर ते मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. त्यात हापूसच्या आंब्याचा सुरेख रंग व चव श्रीखंडाला येते.
हे लाडू श्रावण सोमवारी, नैवेद्याला गणपतीला, गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला मुद्दाम करतात. कृती- १ वाटी तूप, १ वाटी पीठीसाखर आणि १ वाटी कणीक कपडय़ात सैल पुरचुंडी बांधून चाळणीवर ठेवून, दहा मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून […]
साहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ. कृती- प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions