साहित्य :- १५० ग्राम टोफू, १ चमचा कॉर्न स्टार्च, ४ चमचे तेल, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा आले पेस्ट, २ चमचे रेड चिली गार्लिक पेस्ट, १/४ वाटी पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून, १/४ वाटी कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा.), १/४ वाटी भोपळी मिरची, मध्यम तुकडे, १ चमचा सोयासॉस, १/२ चमचा व्हिनेगर, चवीपुरते मीठ.
कृती :- टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाऊ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा आणि हलकेच मिक्स करावे. एक मध्यम पॅन घेऊन त्यात १ चमचा तेल घालावे. त्यात टोफू शालोफ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोडय़ा ब्राउन करून घ्यावात. शालोफ्राय करून झाले की टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा. त्याच पॅनमध्ये अजून १ चमचा तेल घालावे. त्यात आले-लसूण पेस्ट परतावी. सोया सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत. १ चमचा कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ चमचे पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे. आता शालोफ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सव्र्ह करावे. सव्र्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.
टिपा :- वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ चमचा कॉर्न स्टार्च १/२ वाटी पाण्यात घालून मिक्स करावे. चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेव्हीबरोबर थोडा साधा पांढरा भातही सव्र्ह करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply