
साहित्य:- १० ब्रेड स्लाइस, ५० ग्रॅम चीज, ३-४ हिरवी मिरची, ४-५ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, ५० ग्रॅम बटर, अर्धी जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार.
कृती:- एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मीठ टाकून नीट मिक्स करून ब्रेड स्लाइसवर स्पेड करून घ्यावे. पसरट काचेच्या भांडय़ात हे टोस्ट ठेवून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइस नरम वाटल्यास मायक्रो मीडियमवर अजून २-३ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी काप करून गरम सव्र्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply