साहित्य:- ८ ब्रेडचे स्लाइस, बटर ,१ वाटी मऊ शिजवलेले काबुली चणे ,१ चमचा लिंबाचा रस ,थोडेसे मीठ आणि मिरपूड.
पेस्टोसाठी:- दीड वाटी कोथिंबीर, २ ते ४ हिरव्या मिरच्या, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, ७-८ बदाम, ३-४ लसूण पाकळ्या, २ चमचे लिंबाचा रस, चिमूटभर मिरपूड, चवीपुरते मीठ.
इतर साहित्य:- किसलेले चीज, चिली फ्लेक्स, १ कांदा, पातळ गोल चकत्या, १ टॉमेटो, पातळ गोल चकत्या.
कृती:- काबुली चणे मॅश करून घ्यावे. त्यात लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घालून मिक्स करावे.
पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply