
साहित्य : तीन वाटय़ा सोया मिल्क, र्अध केळं, २ चमचे कोको पावडर, १/४ चमचा चॉकलेट इसेंस, साखरेचा पाक गरजेनुसार, गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम.
कृती : निम्मे सोया मिल्क आईस क्युब ट्रेमध्ये घालून गोठवून घ्यावे. मिक्सरमध्ये सोया मिल्कचे क्युब, केळं, कोको पावडर, साखरेचा पाक, चॉकलेट इसेंस आणि सोय मिल्क असे सर्व मिश्रण छान घुसळून घ्यावे. ग्लासमधे ओतावे. क्रीम आणि किसलेले चॉकलेट घालून सजावट करावे. लगेच सव्र्ह करावे. टीप :कोको पावडरऐवजी चॉकलेट मेल्ट करून वापरण्यासही हरकत नाही. त्यावेळी शुगर सिरप कमी वापरावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply