
दोन वाटी मैदा
१ वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी कोको
चमचा बेकिंग सोड
अर्धा चमचा मीठ
अर्धी वाटी रिफाईंड तेल
१ वाटी दही/ताक
दीड चमचा व्हॅनिला एसेन्स
पाककृती
मैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे. त्याते तेल ताक आणि व्हॅनिला घालून मिश्रण खूप घुसळावे. पिठात गुठळी राहू देऊ नये. तुपाचा हात फिरवलेल्या केकपात्रात मिश्रण ओतावे व मध्यम आंचेवर सुमारे २५-३० मिनिटे केक भाजावा.
Leave a Reply