साहित्य :- १ टेबल्स्पून कोको पावडर, १ टीस्पून इन्स्टंट कॉफी, १/२ केळ, २-३ काजु अगर बदाम, २-३ बिया काढलेले खजूर, १/२ कप पाणी, गरजेप्रमाणे बर्फाचे खडे.
कृती – खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.
टीप – कोको पावडर शक्यतो दूध, साखर न मिसळलेली अशीच वापरावी. साधी कॉफी वापरायची असेल तर पाण्यात कॉफी उकळून, गाळून, थंड करून वापरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply