
साहित्य – दोन वाट्या मक्याचे दाणे, एक वाटी दूध, अर्धी वाटी गूळ, वेलची पूड, केशर.
कृती – कॉर्नचे दाणे मिक्सरवर वाटून गाळून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे. गॅसवर ठेवून ढवळत राहावे. त्यात गूळ व वेलची पूड घालावी. मग एका भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात केशरच्या काड्या घालाव्या. हे भांडे कुकरमध्ये ठेवून खरवस शिजवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply