साहित्य:- २०० ग्रॅम ब्राउन शुगर, १७५ ग्रॅम सॉल्टेड बटर, ५० मिली. मध, १ अंडे, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, २ टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून दालचिनी पूड, २ टीस्पून जिंजर पावडर किंवा सुंठ, १ टीस्पून लवंग पूड आणि कुकी घोळवण्यासाठी दाणेदार साखर
कृती:- ओव्हन २०० अंश से. ला प्रीहिट करा. बटर पेपर लावून बेकिंग ट्रे तयार करून ठेवा.
एका मोठ्या भांड्यात बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंड घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे. किमान तीन इंचांच्या अंतरावर दुसरा गोळा असाच साखर पेरून ठेवा. या पद्धतीने सगळ्या कुकीज ट्रेमध्ये लावून घ्या. २०० अंश सेल्सिअसवर साधारण १२ मिनिटं बेक करा. लगेच कुकी शीटवर गार होण्यासाठी ठेवून द्या. कुकीज थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply