साहित्य – ४ वाट्या जाडसर कणीक, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक भिजविण्यास दूध, ३ वाटी तूप, २ टी स्पून वेलची पूड, आवडीनुसार बेदाणे, चारोळी.
कृती – चवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत. नंतर लगेचच मिक्सटरमधून ते काढावेत. अशा तऱ्हेने सर्व मुटकुळे मिक्सेरमधून काढावेत. (थोडे जाडसर) नंतर त्यात पिठीसाखर बेदाणे, चारोळी, वेलदोड्याची पूड घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. नंतर तूप गरम करून त्यात घालावे आणि लाडू वळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply