‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी. चटणीमधला बहुतेकांच्या आवडीचा एक प्रकार म्हणजे इडली-डोशांसाठी केली जाणारी ओल्या खोबऱ्याची चटणी. नारळ फोडून, खोबरं खवून त्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून केली जाणारी ही म्हटलं तर साधी चटणी, पण तिची चव असते ती तिच्या ताजेपणात व रंगात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही प्रकार चटणीचे
इडली बरोबरची चटणी
साहित्य:- एक टेबलस्पून चणाडाळ, अर्धा टेबलस्पून शेंगदाणे, एक कप ओला नारळ (खोवून), चार लसूण पाकळ्या, पाव टी स्पून जिरे, दोन टेबल स्पून पंढरपुरी डाळ, अर्धा कप दही, हिरव्या मिरच्या, 2 टेबल स्पून कोथिंबीर, साखर व मीठ चवीनुसार.
फोडणीकरिता:- एक टेबल स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, पाव टी स्पून हिंग, एक लाल सुकी मिरची, सात-आठ कढीपत्ता पाने.
कृती:- चणाडाळ ४-५ तास भिजवा. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावेत. ओला नारळ खोवून घ्यावा. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. मिक्ससरच्या भांड्यात चणाडाळ, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर, मीठ, जिरे, पाव कप पाणी घालून मिक्सीरमध्ये बारीक करून घ्यावे. एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता पाने, लाल मिरची घालून फोडणी करून वाटलेल्या चटणीवरती घालून, मिक्सर करून मग दही मिक्सर करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इडलीची सुकी चटणी
साहित्य : एक कप उडीदडाळ, पाऊण कप चणाडाळ, पाच-सहा लाल सुक्याव मिरच्या, दोन टेबल स्पून तीळ, एक टेबल स्पून कढीपत्ता, पाव कप सुके खोबरे (किसून).
फोडणीकरिता:- एक टेबल स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, पाव टी स्पून हिंग
कृती:- कढईमध्ये एक टे. स्पून तेल गरम करून त्यामध्ये उडीदडाळ, चणाडाळ, तीळ, लाल मिरची, कढीपत्ता पाने, मीठ व सुके खोबरे घालून दोन मिनीटे मंद विस्तवावर परतून घ्यावे. मग मिक्स्रमध्ये जाडसर वाटून घ्यावे. फोडणीकरिता एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग घालून फोडणी वाटलेल्या चटणीवर घालून मिक्स करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कच्चा टोमॅटोची चटणी
साहित्य : दोन मोठे हिरवे टोमॅटो (चिरून), एक छोटा कांदा (चिरून), दोन हिरव्या मिरच्या (चिरून), एक टेबल स्पून शेंगदाणे कूट, १ टेबल स्पून कोथिंबीर (चिरून) साखर व मीठ चवीने
फोडणीकरिता १ टेबल स्पून तूप (गरम), १ टी स्पून जिरे
कृती:- कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मिक्सक करून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर दोन मिनिटे शिजू द्यावे. मग त्यामध्ये मीठ, साखर, कोथिंबीर घालून मिक्सन करून 1-2 मिनिटे मंद विस्तवावर शिजू द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कवठाची चटणी
साहित्य : एक कप ताज्या कवठाचा गर, १ टी स्पून जिरे पावडर, १ कप गूळ, १ टी स्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीने.
कृती : कवठ फोडून त्याच्या मधील गर काढून घ्यावा व चमच्याने चांगला फेटून घ्यावा. जेवडा कवठाचा गर असेल तेवढा गूळ घ्यावा. जिरे थोडेसे भाजून बारीक करावे. मग कवठाचा गर, जिरे पूड, गूळ, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करावे. लाल मिरची पावडर व जिरे न टाकतासुद्धा ही चटणी छान लागते. गोड हवे असेल तर थोडी साखर मिक्सू करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कांदा व शेंगदाणे चटणी
साहित्य:- दोन मोठे कांदे (बारीक चिरून), सात आठ लसूण पाकळ्या, एक इंच आले तुकडा, दोन टी स्पून लाल मिरची पावडर, एक टी स्पून गरम मसाला, अर्धा कप शेंगदाणे कूट (जाडसर), मीठ चवीने, कोथिंबीर सजावटीसाठी.
फोडणीकरिता:- २ टेबल स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, पाव टी स्पून हिंग, पाव टी स्पून हळद
कृती:- कांदा, आले-लसूण बारीक चिरून घ्यावे. शेंगदाणे भाजून साले काढून जाडसर कुटून घ्यावेत.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा, आले-लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून शेंगदाणे कूट घालून मिक्स करून, थोडे तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर कोथिंबिरीने सजवावे. ही चटणी 2-3 दिवस छान टिकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काळ्या मनुक्यांणची चटणी
काळ्या मनुक्यां्ची चटणी छान आंबट-गोड अशी लागते. मनुके गोड असतात, त्यामुळे साखर घातली नाही तरी चालते.
साहित्य: एक कप काळे मनुके (बिया काढून), दोन टेबल स्पून काळे मनुके (बारीक चिरून), एक टेबल स्पून लाल मिरची पावडर, १ टेबल स्पून जिरे पावडर, १० पुदिना पाने, २ टेबल स्पून गूळ, ३ टेबल स्पून लिंबूरस, १ टी स्पून मीठ.
कृती:- काळे मनुके धुऊन एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. मिक्ससरमध्ये लाल मिरची पावडर, जिरे पावडर, पुदिना पाने, गूळ, लिंबूरस, मीठ घालून चटणी वाटून घ्यावी. चटणी वाटून झाली की मनुके घालून मिक्स करून अर्धा तास चटणी तशीच बाजूला ठेवावी. मग सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काश्मिवरी डाळिंबाची चटणी
साहित्य:- एक कप डाळिंबाचे दाणे, अर्धा कप कोथिंबीर, पाव कप पुदिना पाने, एक छोटा कांदा, २ हिरव्या मिरच्या (लहान), १ टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून चाट मसाला, अर्धा टी स्पून लिंबूरस, मीठ व साखर चवीने.
कृती:- कोथिंबीर, पुदिना पाने धुऊन चिरून घ्यावीत. हिरवी मिरची चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. जिरे कुटून घ्यावे. डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कांदा, जिरे, चाट मसाला, लिंबूरस, मीठ, साखर व ३-४ टेबल स्पून पाणी घालून मिक्सीरमध्ये चटणी बारीक वाटून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply