आजचा विषय चटणी भाग तीन

टोमॅटो चटणी
साहित्य:- २ लाल टोमॅटो, २-३ हिरव्या किंवा लाल ओल्या मिरच्या, ४-५ जाड लसूण पाकळ्या, २ टेबल स्पून व्हिनेगर, मीठ, कोथिंबीर, दीड टेबल स्पून साखर, १ टेबल स्पून भाजलेल्या जिऱ्याची भरड पूड.
कृती:- टोमॅटो, मिरच्या आणि लसूण पापडाच्या जाळीवर ठेवून डायरेक्टल जाळावर भाजून घ्यावीत. सगळं बारीक चिरून घ्यावं. कोथिंबीर चिरून घ्यावी. सगळं साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्यावं. यात आंबट चव जास्त नको असेल, तर व्हिनेगर न वापरता एखादा टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल घातलं तरी छान चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

गवारीची चटणी
साहित्य:- गवार १ वाटी, तीळ १ मोठा चमचा, हिरवी मिरची ४-५, चिंचेचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ व साखर. फोडणीचे साहित्य आणि तेल १ छोटा चमचा.
कृती : गवार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात गवार, शेंगदाणे, मिरची, तीळ घालून चांगले परता. गरज असल्यास थोडेसे पाणी घाला. आपल्याला गवार नुसती परतवून घ्यायची आहे, शिजवायची नाही. त्यामुळे त्याचा हिरवा रंग तसाच टिकला पाहिजे. थंड झाल्यावर चिंच व मीठ घालून वाटून घ्या.
टीप : ही चटणी परोठा, थालीपीठ याबरोबर खायला देऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

सोयाबीन चटणी
साहित्य : सोयाबीन पाव वाटी, कोथिंबीर १ वाटी, हिरव्या मिरच्या ५-६, आले १ छोटा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, लिंबाचा रस १ मोठा चमचा, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती:- रात्रभर सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाण्यातून काढून गरम पाण्यात शिजवून घ्या. मग त्यात चटणीसाठी लागणारे इतर साहित्य घालून चटणी वाटून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून ती फोडणी चटणी घालून चटणी कालवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कारळ्याची चटणी
साहित्य:- कारळे १ वाटी, भाजलेले दाणे अर्धी वाटी, तीळ अर्धी वाटी, सुके खोबरे पाव वाटी, कढीपत्ता एक वाटी, सुक्या लाल मिरच्या १० – १५, मीठ साखर चवीप्रमाणे, हिंग चवीनुसार, तेल १ छोटा चमचा.
कृती : कारळे, दाणे, तीळ हे सर्व भाजून घ्यावे. कढईत तेल घालून कढीपत्ता, लाल मिरची, सुके खोबरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. सर्व पदार्थ मीठ व हिंग घालून वाटून घ्या.
टीप : कारळ्याच्या चटणीप्रमाणे तीळ (पांढरे आणि काळे ) व जवस ह्याची चटणी करता येते. कारळ्याऐवजी तीळ १ वाटी घ्यावे/ जवस १ वाटी घ्यावे. बाकी सर्व साहित्य व कृती कारळ्याच्या चटणीप्रमाणे घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चटणी पूड
साहित्य : चण्याची डाळ १ वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी, तांदूळ पाव वाटी, वाळलेल्या मिरच्या ८-१०, सुके खोबरे पाव वाटी, चिंच, गुळ चवीप्रमाणे, धने २ चमचे, जिरे १ चमचा, कढीपत्ता १ वाटी, २ मोठे चमचे तेल, चवीपुरते मीठ.
कृती:- प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ बदामी रंगावर भाजून खलबत्त्यात जाडसर पीठ काढून घ्यावे. खोबरे किसून किंवा बारीक तुकडे करून कढीपत्ता व मिरच्या तेलावर भाजून घ्या. धने व जिरे भाजून घ्या. हे सर्व जिन्नस एकत्र करून वरील डाळीच्या व तांदळाच्या पिठात मिसळून त्यात चिंच व गुळ घालून पुन्हा एकत्र कुटावे. ही चटणी पुष्कळ दिवस टिकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दोडक्याच्या व दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी
साहित्य:- दुधी भोपळा सळ १ वाटी, दोडक्याचे साल १ वाटी, हिरव्या मिरच्या ७-८, सुक्या खोबऱ्याचा कीस १ वाटी, तीळ १ वाटी, फोडणीचे साहित्य, शेंगदाण्याचे जाडसर कूट १ वाटी, तेल १ मोठा चमचा, मीठ व साखर चवीप्रमाणे.
कृती : प्रथम दोडक्याची व दुधी भोपळ्याची साले बारीक चिरून घ्या. तीळ, खोबरे, दोडक्याचे व दुधी भोपळ्याची साले, मिरच्या थोडया तेलावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कढईत थोडेसे तेल घालून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून त्यात मीठ व साखर घालून चांगले हलवा. ही चटणी घट्ट झाकण असलेल्या डब्यात घालून ठेवा म्हणजे सादळत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

उडदाच्या डाळीच्या चटणी
साहित्य : उडदाची डाळ अर्धी वाटी, मिरच्या ४-५, कैरीचा कीस चवीप्रमाणे, मीठ व साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर अर्धी वाटी, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : उडदाच्या डाळ ऐवजी चण्याची डाळ भिजवून वापरू शकता. कैरीऐवजी लिंबाचा रस २ छोटे चमचे या प्रमाणात वापरू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

करवंदाची चटणी
साहित्य : करवंद हिरवी बिया वाढलेली १ वाटी, गुळ बारीक चिरलेला १ मोठा चमचा, मीठ चवीप्रमाणे, लाल मिरच्या ५ ते ७, सुके खोबरे – अर्धी वाटी, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर पाव वाटी.
कृती : तेल आणि फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. तेल कढईत गरम करून फोडणी तयार करा आणि चटणीवर घाला. चटणी कालवून खायला दया.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बटाटयाची चटणी
साहित्य : बटाटा २ छोटे साल काढून, तेल, मिरच्या ४-५ बारीक चिरलेल्या, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर पाव वाटी, सुके खोबरे पाऊण वाटी, लसूण- ५ ते १० पाकळ्या, मीठ, चवीप्रमाणे, साखर चवीप्रमाणे, लिंबाचा रस २ छोटे चमचे.
कृती : तेल आणि फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्या. कढईत तेल गरम करून फोडणी करून ती चटणीवर घाला. चटणी कालवून खायला दया.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

डाळींची कोरडी चटणी
साहित्य:- अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, २० लाल सुक्या मिरच्या, हिंग, तेल, तीळ.
कृती:- प्रथम २ चमचे तीळ कोरडे भाजून त्यात नंतर थोडे हिंग तळून घ्यावे. नुसत्या तेलावर डाळी वेगवेगळ्या परतून घ्याव्यात. सर्व जिन्नस एकत्र करून चवीपुरते मीठ घालून मिक्स़रमधून पूड करून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कर्नाटकी पूड चटणी
साहित्य:- हरभरा डाळ अर्धी वाटी, अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी सुके खोबरे, ४-५ लाल मिरच्या, २ मोठे चमचे धने, १ मोठा चमचा जिरे, लिंबाएवढी चिंच, चवीपुरते मीठ, थोडा कढीलिंब
कृती:- प्रथम हरभरा डाळ व उडदाची डाळ लालसर भाजून घेउन मिक्स़रवर जाडसर बारीक़ करून घ्यावी. तीळ भाजून कूट करून घ्यावे. खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स़रवर बारीक़ करून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिरचीचा ठेचा
साहित्य:- हिरव्या मिरच्या शंभर ग्रॅम, लसूण पन्नास ग्रॅम, मीठ छोटे दोन चमचे, तेल चार चमचे.
कृती :- मिरच्या व लसूण मिक्सरला अर्धवट बारीक करून घ्याव्यात. त्यानंतर लोखंडी तव्यावर तेल घालून त्यात अर्धवट बारीक केलेल्या मिरच्या व लसूण भाजून घ्यावे. मिरच्या अगदी पांढ-या रंगावर भाजून घ्याव्यात.मिरच्या भाजत असतांना त्या ठेचून घ्याव्यात. त्यातच चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण जरा जास्ती वेळ परतावे म्हणजे टिकाऊ होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिरचीचा ठेचा (कोल्हापुरी)
साहित्य:- दहा बारा मिरच्या, कोथिंबीर, सहा ते सात पाकळी लसूण,पाव चमचा जिरे, आल्याचा तुकडा,तेल, चवीनुसार मीठ.
कृती:- तव्यावर थोड तेल टाकून त्यावर हिरव्या मिरच्या, लसूण खरपूस भाजून घ्या नंतर त्यात जिरे घालून थोडं भाजून घ्या.हे जिन्नस थंड होऊ द्या. दगडी खलबत्ता घेवून त्यात कोथिंबीर, आल्याचा तुकडा व वरील भाजून घेतलेले जिन्नस व मीठ टाकून जाडसर वाटून घ्या. हा ठेचा दही मिसळून खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*