कोल्ड कॉफी

साहित्य :- १०० मिली गरम पाणी, ३०० मिली दूध, २ चमचे इन्स्टंट कॉफी, २ चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, १ चमचा मध, १ चमचा साखर, १ वाटी बर्फाचे तुकडे.

कृती :- दोन चमचे इन्स्टंट कॉफी आणि १०० मिली गरम पाणी एकत्र करून ते मिक्सरच्या साह्याने छान घुसळून घ्या. जोपर्यंत कॉफी पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत घुसळा. त्यानंतर त्यामध्ये साखर, मध आणि व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घाला. हे मिश्रण पुन्हा एकदा घुसळून घ्या आणि त्यामध्ये दूध घाला. दूध घातल्यावर पुन्हा घुसळा आणि त्यात बर्फाचे तुकडे आवश्यकतेप्रमाणे घाला. यानंतर पूर्ण मिश्रण पुन्हा एकदा घुसळा. तुमची कोल्ड कॉफी तयार झाली आहे. काचेच्या ग्लासमधून तुम्ही ती सर्व्ह करू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*