साहित्य:- टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाईस, थोडं बटर .
कॉर्न स्ट्यूसाठी :- तीन गावरान मक्याची कणसं, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, दोन कप दुध, एक मोठा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लोणी, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ .
कृती :- कणसं सोलून किसणीवर किसून घ्यावीत . मिरच्या एकदम बारीक चिराव्या. कणसाच्या किसात दुध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टया कराव्यात. नॉनस्टीकच्या भांडयात लोणी तापवावं आणि त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्या. बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. मग शिजलेलं दुध आणि कॉर्न घालून मीठ आणि मिरपूड घालावी. खाली उतरवल्यावर कोथिंबीर मिसळावी. वाढायच्या वेळी कॉर्न स्ट्यू परत गरम करावं. ब्रेडचे स्लाईस टोस्टरमधून भाजावेत. त्रिकोणी दोन तुकडे कापावेत. त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न स्ट्यू पसरावं. टोमॅटो सॉसबरोबर खायला दयावं.
Leave a Reply