साहित्य: दीड कप मक्याचे दाणे, १/२ कप ज्वारीचे पीठ, ३ टेस्पून बेसन, २ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मीठ,
तळण्यासाठी तेल.
कृती: मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे.) भरडलेल्या दाण्यात ज्वारीचे पीठ, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी. चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
Leave a Reply