साहित्य:- १कप कॉर्न, १कप मटार, १ कप किसलेले पनीर, ६/७ ब्रेड स्लाईज, एक मोठा बटाटा उकडुन घेतलेला, कोथिंबीर एक मोठा चमचा, चाट मसाला, गरम मसाला, मीर पुड, प्रत्येकी एक चमचा, आल लसुण हिरवी मिरची पेस्ट २चमचे ,कॉर्न फ्लॉवर एक ते दोन चमचे, थोडं तेल.
कृती :- मटार उकडुन घ्या , कॉर्न उकडुन घ्या. बटाटा उकडुन कीसुन घ्या.मटार आणि कॉर्न मिक्सर मधे फिरवून घ्या. हे सगळं एकत्र करून घ्या. ब्रेडला थोडं पाणी मरून कुस्करुन हे वरील मिश्रणात मिक्स करा. त्यात कोथिंबीर , आल लसुण पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, मीर पुड, मीठ किसलेले पनीर सगळं मिक्स करून मळून घ्या. मग हाताला थोडं पाणी लावुन त्या मिश्रणातला एक छोटा गोळा घेऊन हवा तो आकार दया. मग याला गरम तव्यावर थोडं तेल सोडुन दोन्ही बाजूंनी छान गुलाबी रंगावर भाजुन घ्या. सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
Leave a Reply