साहित्य :- 250 ग्रॅम बेबी कॉर्न, एक कप उभ्या चिरलेल्या भाज्या (कोबी, सिमला मिरची, गाजर इत्यादी), 3-4 हिरव्या मिरच्या, दोन चमचे शेजवान सॉस, चिमूटभर अजिनोमोटो, अर्धा कप मैदा, पाव कप पाणी, काळी मिरेपूड, मीठ, चवीनुसार तेल.
कृती :- प्रथम बेबीकॉर्न शिजवून घ्या. मैद्यामध्ये पाणी आणि मीठ मिसळून मिश्रण तयार करा. बेबी कॉर्नचे दोन तुकडे करून मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि तेलात तळून घ्या. कढईत एक चमचा तेल गरम करून उभी कापलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. यात सर्व भाज्या, मीठ, अजिनोमोटो व शेजवान सॉस घालून चांगले परतून घ्या. यात सर्व भाज्या, मीठ, अजिनोमोटो व शेजवान सॉस घालून चांगले परतून घ्या. तळलेले बेबी कॉर्न घालून पुन्हा परतून घ्या. चिली सॉस किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply