साहित्य: कॉर्न १ कप, ७ ते ८ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे मैदा, हळद, मीठ, पाणी, तळायला तेल.
मसाल्या साठी: कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून, बारीक चिरलेली मिरची, तिखट थोडं.
कृती: एका पातेलीत पाणी उखलायला ठेऊन त्यात कॉर्न घालून ५ मी चांगले शिजवून घ्या. शिजलेले कॉर्न पाण्यातून काढून टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. पातेलीत कोरडे कॉर्न घेऊन त्यावर ४ चमचे कॉर्नफ्लोवर व २ चमचे मैदा, मीठ व हळद घालून मळून घ्या. मळताना जोर लावून मळलं गेलं पाहिजे. जर दाणे एक मेकाला चिकटले असतील तर आजून थोडा मैदा आणि कॉर्नफ्लोवर घालून मळुन घ्या. आता दाणे वेगळे झाले असतील जर पीठ जास्त मोकळे झाले असेल तर तळताना पीठ तेलात जाईल म्हणून अगदी किंचित पाण्याचा शिपका मारून परत मळून घ्या. कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाले की त्यात दाणे टाकून मिडीयम फ्लेम वर ४ ते ५ मी तळून घ्या व टिशू पेपर वर दाणे काढून ठेवा. दाणे काढलेली २ मी चाळणीत ठेवा नाहीतर मऊ पडण्याची शक्यता असते. एका कढईत तेल हाय फ्लेम गरम करा त्यात कांदा, मिरची, लसूण , कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या व शेवटी लिंबू किंवा विन्हेगर घालून हलवा. ग्यास बंद करून त्यात तळलेले दाणे घालून हलवा आणि डिश मध्ये काढून कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा.
Leave a Reply