साहित्य : १ सॅण्डवीच ब्रेड, २ कप ताजं दही, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ इंच बारीक चिरलेलं आलं, २ कढीपत्त्याची पानं, ३ चमचे साखर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. ब्रेडची एक स्लाईस घेऊन त्यावर दोन चमचे दह्याचे मिश्रण टाकून ब्रेडवर ते सगळीकडे पसरावं व त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालावं. त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून नंतर तयार केलेली ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवून ती दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. ब्रेड त्रिकोणी कापून ते हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply