साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मोड आलेली मेथी, 2-3 चमचे गोडा मसाला, हळद, तिखट, मीठ, 8-10 पाकळ्या लसूण, खवलेले ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : तुरीची डाळ शिजवताना त्यात हळद, हिंग व मोड आलेली मेथी घाला. डाळ शिजली की ती घोटा. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, चिंच कोळ आणि गोडा मसाला घाला. नंतर हिंग, मोहरी व लसणाची फोडणी देऊन उकळा. वाढून घेताना ओले खोबरे व कोथिंबीर घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply