
साहित्य:- एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मेथी दाणे,४-५ सुक्याक लाल मिरच्या, १०-१२ कडीलिंबाची पाने, ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य.
कृती:- मेथी दाणे रात्रभर भिजवा. सकाळी उपसून ठेवा. फडक्या्त बांधून मोड येऊ द्या. आता तुरीची डाळ व मेथ्या पाणी घालून शिजवा. खूप जास्त शिजवू नका. तेलाची फोडणी करा. त्यात ठेचलेला लसूण व मिरच्यांचे तुकडे घाला. कडीलिंबाची पाने, तिखट, मीठ, हळद, चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला घाला. परतून दोन वाट्या पाणी घाला व उकळी आली, की डाळ-मेथी घाला. एक उकळी आणा. वरून खोबरे-कोथिंबीर घाला.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply