
साहित्य : २ वाटया खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, ६-७ चहाचे चमचे भरून पिठी साखर, पाव चमचा वेलदोडा पूङ
कृती : दाण्याचे कूट, साखर व वेलदोडा पूड एकत्र करून घ्या व नीट कालवून घ्या. मुठीने लाडू वळा. दाण्याचे कूट जर खूप भरभरीत असेल तर त्याला किचिंत ओले हात लावून मळा व मुठीने लाडू वळा.
टीप : काहीजणांना साखरेऐवजी गूळ आवडत असेल तर ४-५ चमचे बारीक चिरलेला गूळ घेऊन हाताने तो बारीक करून त्यातले सगळे खडे काढून टाकावेत.
Leave a Reply