साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या.
कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन पूर्ण गार होऊ द्यावा, किंवा शक्यतो सकाळी दही भात करायचा असेल तर रात्रीच शिजवून तयार केलेला असला तर फारच बरे. गार भात पातेलीत घाला त्यात दही, दध घालून नीट कालवा. नंतर त्यात सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घाला. भाताची चव घेऊन पहा. आवश्यकता असेल तरच त्यात मीठ घाला. सांडग्या मिरचीत मीठ असते, म्हणून मीठ घालण्याआधी नेहमी चव घेऊन पहा. हा भात केळीच्या पानावर फार चांगला लागतो.
टीप : हा भात कालवल्यानंतर फार वेळ ठेवल्यास तो फुगतो व घट्ट होता. अशावेळी त्यात पुन्हा थोडेसे दूध घालून भात कालवून खावा
Leave a Reply