साहित्य:- दोन वाट्या उडदाची डाळ, जिरे, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, मीठ, दही, उकडलेले मूग, साखर, जिरेपूड, पापडी, बारीक शेव, चिंचेची चटणी, तिखटपूड.
कृती:- दोन वाट्या उडदाची डाळ चार-पाच तास भिजत घालावी. नंतर मिक्सारमध्ये वाटून घ्यावी. वाटताना त्यात थोडे जिरे, आल्याचा तुकडा व एखादी मिरची घालावी. वाटून झाल्यावर त्यात मीठ घालावे. त्याचे लहान लहान गोळे करून तळून घ्यावेत. हे तळलेले वडे पाण्यात घालावेत व नंतर दाबून पाणी काढून टाकावे. तीन-चार वाट्या दही घुसळून घ्यावे. त्यात मीठ, साखर, जिरेपूड घालावी. हे दही उडदाच्या वड्यांवर घालावे. त्या दहीवड्यांवर उकडलेले मूग घालावेत. पापडी कुस्करून घालावी व बारीक शेव भुरभुरावी. वरून थोडे दही घालावे. त्यावर चिंचेची चटणी व लाल तिखट पूड घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply