साहित्य – ब्रेड, टोमॅटो, कांदा, काकडी, चीजच्या स्लाईस, ओले खोबरे, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 टेबल स्पून जिरे, 2 टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट, थोडा पुदिना, आले, कोथिंबीर, मीठ, साखर, टोमॅटोचा सॉस.
कृती – प्रथम खोबरे, हिरवी मिरची, जीरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करुन घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पात्तळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॉटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुसऱ्या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या. हा ब्रेड त्या स्लाईसवर ठेवा. आता ब्रेडच्या वरच्या बाजूला टोमॅटो केचप लावा. आता त्यावर पुन्हा एक चीजची स्लाईस ठेवा, त्यावर काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या ठेवा. दुसऱ्या ब्रेडला केचप लावून घ्या आणि ही स्लाईस पालथी ठेवा. आता त्रिकोणी आकारात हे स्लाईस व्यवस्थीत कापून घ्या. कापताना स्लाईसच्यामध्ये घातलेले सॅलेड व्यवस्थीत कापा. या सॅन्डविचला हिरवी चटणी आणि केचपमुळे चांगली टेस्ट येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply